आनंद वैद्य व प्रा. सुभाष गोवेकर यांचा कोमसाप तर्फे सत्कार
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कोकण मराठी साहित्य परिषदचा वर्धापन दिन सोहळा आज मंगळवारी रत्नागिरी मालगुंड येथे संपन्न झाला. यावेळी केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रंथमीत्र पुरस्कार प्राप्त कोमसापचे जेष्ठ सदस्य श्री. आनंद वैद्य व सावंतवाडी तालुका शाखेचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर यांचा कवी केशवसुत स्मारक या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा. सुभाष गवेकर यांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कोकण मराठी साहित्य परिषदेतच्या अध्यक्षा सौ. नामिता कीर आधी पदाधिकारी उपस्थित होते.


