सागर कारिवडेकर याच्या बंगल्याला जप्तीची नोटीस
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आज मंगळवारी सावंतवाडीत आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातील संशयित सागर कारिवडेकर यांच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत बंगल्याला जप्तीची नोटीस लावून ताबा घेतला. या कारवाईने शहरात जोरदार चर्चा चालू आहे. महाराष्ट्र पोलीस यांच्या ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट कारवाई करत संबंधित बंगल्यातील सर्व मालमत्ता गुन्ह्यातील जप्त मालमत्ता म्हणून घोषित केली. नोटीसमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही त्या परिसरात प्रवेश करू शकणार नाही.
ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ नुसार ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर सावंतवाडीमध्ये राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


