केरळातील अनाक्कम्पोयिल-मेप्पाडी’ बोगदा प्रकल्पाजवळ दरड कोसळून अनेक कामगार अडकलेत…
मल्लपुरम / वृत्तसंस्था
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीजवळील कल्लाडी येथेही दरड कोसळली असून यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्ती केली जातेय. यातील तीन कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांना जोडणाऱ्या अनाक्कम्पोयिल-मेप्पाडी’ बोगदा प्रकल्पाजवळ ही दुर्घटना घडली आहे. सध्या उत्तर केरळातील डोंगर पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
मीनाक्षी पुलाजवळ अनाक्कम्पोयिल-मेप्पाडी’ बोगद्याचे काम चालू आहे. या बोगद्याजवळ दरड कोसळली असून त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. भूस्खलनानंतर कल्पेट्टा येथील अग्निशमन व बचाव दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन व बचाव दल, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकांकडून शोध व बचाव कार्य राबवले जात आहे, अशी माहिती तेथील एका अधिकाऱ्याने दिली आहे


