न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मळगाव येथे महिलांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून बांधला वनराई बंधारा 

 

सिंधुदुर्ग /  राजू तावडे 

    एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने मळगाव रेडकरवाडी येथे वनराई बंधारा बांधला. रेडकरवाडीतील ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हा बंधारा बांधण्यात आला. यासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांचेही विशेष सहकार्य लाभले.

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे सद्यस्थितीत मळगाव गावात पाण्याची पातळी कमालीची खाली जात आहे. या पार्श्वभूमीवर मळगाव रेडकरवाडी येथील झरीच्या वरच्या भागात सिमेंटच्या पिशव्यांच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यासाठी महिलांनी विशेष पुढाकार घेतला. रेडकरवाडीतील ग्रामस्थांनी देखील त्यांच्या या कार्याला बळ देत बंधारा पूर्ण केला. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण झाल्यामुळे निचरा होऊन या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे