न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप

सिंधुदुर्ग /  राजू तावडे

कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून सोमवारी दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्याकडे गणेश पुजा साहित्य सुपूर्द करण्यात आले.
भाजपा जनसंपर्क कार्यालय, सावंतवाडी येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विशाल परब यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांकडे पूजा साहित्य देण्यात आले. हे साहित्य दोडामार्ग तालुक्यातील गणेशभक्तांच्या घरोघरी सन्मानपूर्वक पोहोचवावे आणि त्यांच्या गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन विशालज परब यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी रंगनाथ गवस, शिरीष नाईक, तसेच तालुक्यातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख महेश लोंढे, सूर्याजी झेंडे, सुरेंद्र संभाजी सावंत, प्रकाश गवस संतोष आईर, उसप बूथ अध्यक्ष नीलेश नाईक, नवनाथ साळिकर, विनायक सावंत, शंकर परब, किशोर शेट्ये, उत्तम दळवी, विठ्ठल गवस, वृषभ देसाई, ज्ञानेश्वर आईर, मंगेश नाटेकर, रमेश ठाकूर, चंद्रहास राऊळ, विजय चंद्रकांत ठाकूर, कल्पेश गवस, प्रवीण गवस, यशवंत कुबल, ओंकार रेडकर आणि बूथ अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे