कार्यकारी अभियंता श्री. गोविंद श्रीमंगले त्यांचा रत्नसिंधू जलसंपदा परिवारा तर्फे सत्कार
सिंधुदुर्ग / राजू तावडे
रत्नसिंधू जलसंपदा मित्रपरिवार या ग्रुप तर्फे नुकतेच कुडाळ येथे जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनासाठी विशेष योगदान देणारे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल, कुडाळ या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री. गोविंद श्रीमंगले हे त्यांच्या मातोश्री आजारी असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे राहून गेले होते. गुरुवारी आंबडपाल येथे त्यांच्या कार्यालय जाऊन रत्नसिंधु जलसंपदा मित्रपरिवार नियोजन समितीचे सदस्य ॲड. जयसिंग वारंग, राजू तावडे, संजय शेणई, किशोर साळगावकर यांनी श्रीमंगले यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व जलधारा २०२६ ही स्मरणिका देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी श्री. भगवान पवार उप विभागीय अभियंता, श्री. चिंतामणी वागंड उप विभागीय अधिकारी, विकास परब उप विभागीय अधिकारी, श्री. रुपेश चव्हाण उप विभागीय अधिकारी, श्री. उत्तम तुरंबेकर उप विभागीय अधिकारी, श्री. किशोर साळगावकर, श्री. राजू सावंत प्रभावळकर, श्री. प्रसाद कापडोसकर उपस्थित होते.


