कर्नाटकात सरकारी डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात सेवा करण्यास बंदी
बेंगळुरू/ विनुथा के आर
सरकारी डॉक्टरांना खासगी इस्पितळांमध्ये अंतर्गत रुग्णांवर (आयपीडी : IPD :उपचार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारी डॉक्टरांना त्यांचे नियमित कर्तव्य बजावल्यानंतरच खासगी दवाखाने किंवा रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी : Outpatient Department (OPD)) सेवा देण्याची मुभा आहे.
या संदर्भात राज्य सरकारने आदेश दिला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित सरकारी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेशात उल्लेख असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तर सत्रात मंत्री गुंडूराव यांनी सरकारी इस्पितळांमधील डॉक्टरांची कमतरता, सरकारी डॉक्टरांची प्रॅक्टिस या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली.


