न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घरफोडीचा गुन्हेगार पकडण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांवर मध्यप्रदेशात दगड, शस्त्रांनी हल्ला.. दोन अधिकारी गंभीर

पणजी /

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात गोवा पोलिसांच्या पथकावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांवर 15 ते 20 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या हल्ल्यात गोवा पोलिसांचे एक उपनिरीक्षक आणि एक पोलीस हवालदार गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात (Goa) झालेल्या मोठ्या घरफोडीच्या प्रकरणात अलीराजपूर जिल्ह्यातील काही आरोपींचा सहभाग असल्याची खात्रीलायक माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गोवा पोलिसांचे एक पथक अलीराजपूरमधील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचले होते. स्थानिक पोलीस ठाण्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गोवा पोलीस जेव्हा परतत होते, त्याचवेळी हा घातपात झाला. साधारण 15 ते 20 अज्ञात तरुण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनाला घेरले. या हल्लेखोरांकडे दगड आणि धारदार शस्त्रे होती. तोंड झाकलेल्या या गुंडांनी काही कळण्याच्या आतच पोलिसांवर दगडफेक सुरु केली आणि शस्त्रांनी वार केले.”
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अलीराजपूरचे पोलीस अधीक्षक रघुवंत सिंह भदौरिया यांनी तातडीने जोबट गाठले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे