विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगापाणी येथे २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव
सिंधुदुर्ग / राजू तावडे
वेंगुर्ले तालुक्यातील खानोली सुरंगपाणी येथिल श्री. विठ्ठल पंचायतन देवस्थान येथे बुधवार दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजित केले आहेत. सकाळी पंचायतन मधील श्री दत्त स्वामी महाराज, श्री साई बाबा, श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका, महर्षी व्यास मुनी, श्री विठ्ठल रखुमाई यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.
संध्याकाळी ०६ वाजता प.पू. दादा पंडित महाराज यांची सर्व भक्त परिवाराच्या वतीने पाद्य पूजा करण्यात येणार आहे. श्री. विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगपाणी या स्थानावर हजारो लोकांना दादा महाराज यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रम व पाद्य पूजेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगापाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


