न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

लांज्यात पेट्रोल पंपावर दरड कोसळून एक इसम मातीच्या ढिगा-यात अडकला

रत्नागिरी / प्रतिनिधी

लांजा तालुक्यातील वाकेड घाट परिसरात सुरू असलेल्या नवीन पेट्रोल पंपाच्या बांधकामस्थळी शनिवारी पावसामुळे अचानक दरड कोसळल्याची घटना रात्री घडली आहे. या दुर्घटनेत एका वृद्ध व्यक्तीला दरडीखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्याच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाकेड बौद्धवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गालगत मुंबई येथील श्रीकांत बोबडे यांच्या नवीन पेट्रोल पंपाचे बांधकाम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या केबिनच्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती पावसापासून बचाव करण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी अचानक डोंगराचा काही भाग खचून मोठी दरड कोसळली आणि संबंधित व्यक्ती तिच्याखाली अडकल्याची माहिती आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे