वसईतील मोरी गावात पुरात अडकलेल्या १००च्या आसपास लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले
वसई / वृत्तसंस्था
वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावात पूरस्थितीमुळे अडकलेल्या सुमारे ७० ते १०० नागरिकांचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याची पाहणी केली.
वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि वालीव पोलिसांनी संयुक्तपणे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले”


