भांडुप मध्ये रस्ता खचून टेम्पो खड्ड्यात
मुंबई/ वृत्तसंस्था
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तर मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर भांडूपमध्ये अक्षरश: रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याची दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अत्यंत चित्त थरारक अशी ही घटना आहे.
रस्ता खचला तेव्हा रस्त्यावरील एक टेम्पोदेखील खचलेल्या रस्त्यासह खड्ड्यात पडला. रस्ता खचल्यामुळे परिसरातील बांधकामदेखील जमीनदोस्त झालं. यासोबत दोन झाड देखील कोसळत असल्याचं व्हिडीओत बघायला मिळत आहे. भांडूपच्या एलबीएस रोडवर सोनपूर परिसरात ही घटना घडली आहे.


