व्वा साहेब असावे तर असे… परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी विना हेल्मेट पोलीस अधिका-यांवर केली कारवाई
परभणी/ वृत्तसंस्था
परभणी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाने कडक आदेश जारी केले आहेत.हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून,त्यांच्या सेवापुस्तकातही त्याची नोंद केली जाणार आहे.”


