सामाजिक बांधिलकीला प्रा.सुभाष गोवेकर आणि मुर्गेशन गौंडर यांच्या कडून २५ हजाराची देणगी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी आज २५००० रुपयाचा धनादेश दिला. तर संस्थेच्या सदस्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांचे पती तसेच सावंतवाडी शहरातील व्यापारी फास्टर मुर्गेशन गौंडर यांनी २५ हजार रुपये संस्थेला दिले.
प्रा. सुभाष गोवेकर यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तसेच पटेल परिवाराने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यालि पटेल परिवारा कडून ११ हजार रुपयांची देणगी दिली. या सर्व दात्यांना संस्थेकडून रितसर देणगी पावती देऊन त्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे व उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक यांनी आभार मानले आहेत.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, प्रा.सुभाष गोवेकर, सदस्या शरदिनी बागवे, रूपाली गौंडर( मुद्राळे) लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.


