न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कणकवली पोलीस स्टेशननजीक सात दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

कणकवली पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या आचरा रोडवरील सात दुकाने चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहरात बसवलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. मात्र एका दुकानाच्या खाजगी कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे.शनिवारी पहाटे सना कॉम्प्लेक्समधील ४ आणि राज मेडिकलसह अन्य तीन दुकानांची शटर उचकटून ही चोरी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हवालदार गुनिजन व पांडुरंग पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्याचा शोध घेत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे