न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांद्यात मतदारांना मिळाल्या नाहीत मतदानाच्या स्लीपा… सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिड वाजेपर्यंत ४०टक्के मतदान

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

बांदा येथे आज पर्यंत मतदार यादीतील मतदारांची माहिती दर्शविणाऱ्या मतदानाच्या स्लीपा मतदारांना पोच नझाल्यामुळे बांदा निवडणूक केंद्रावर मतदार यादीतील आपला क्रमांक पाहण्यासाठी मतदारांची धावपळ उडाली होती. याबाबत बांदा ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता हे काम निवडणूक शाखेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर मतदार केंद्रावर उपस्थित असलेले बी एल ओ मॅडम यांनी काही स्लीपा द्यायच्या राहून गेल्याचे सांगितले. निवडणूक शाखेकडून सर्व गावात स्लीपांचे वाटप झाल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिड वाजेपर्यंत ४०टक्के मतदान झाले होते.सावंतवाडी तालुक्यात ४२.८८टक्के मतदान झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे