न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबेनळी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प

रायगड/ वृत्तसंस्था

जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील  वाहतुकीला बसला. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या आंबेनळी घाटात आज, मंगळवारी दरड कोसळली. मुसळधार पावसामुळं पायटा ते कुंभळवणे फाटा या दरम्यान दरड  कोसळली. काही झाडांसह मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. ढिगारा हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे