माजलगावात कार दुचाकी धडकेत मुलाचा मृत्यू
बीड / प्रतिनिधी
माजलगाव शहरात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. शहरातील बायपास रोडवरील तहसील कार्यालयासमोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. एमएच 12 एचएफ 3623 क्रमांकाची कार आणि एमएच 44 एएफ 2395 क्रमांकाची दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात करीम शेख या 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.


