न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार दीपक केसरकर यांच्या समर्थकाला गोव्यात मारहाण.. सिमेवर तणाव

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

 हरमल मांद्रे येथे रविवारी रात्री सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील नागरिकांना मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर चक्काजाम करण्यात आले. शिंदेसेनेच्या युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला. माजी मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे समर्थक सूरज परब यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोवा माद्रे येथे काही गोव्यातील मद्यपी तरूणांनी मारहाण केली होती.
या मारहाणीनंतर गोवा पोलिसांनी तक्रार सुद्धा नोंदवून घेतली नाही. उलट मारहाण झालेल्या तरुणांना ‘ते स्थानिक आहेत. त्यांच्या भानगडीत पडू नका.’, अशा प्रकारे आपल्यालाच समज देण्याचा प्रयत्न गोवा पोलिसांनी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांचे समर्थक सूरज परब यांनी केला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचही या घटनेकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यांच्याकडूनही दखल न घेतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखली अशी माहिती परब यांनी दिली”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे