‘त्या’ घटनेची मांद्रे आमदार जीत आरोलकर यांच्याकडून दिलगिरी व्यक्त…
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
मांद्रेत सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील आमदार दिपक केसरकर समर्थक सुरज परब यांना काही मद्यपींनी मारहाण केली होती.त्या पार्श्वभूमीवर सिमेवर झालेला राडा आणि व्हायरल व्हिडिओ मुळे गोव्यातील पर्यटनाला गालबोट लागू शकते म्हणून आपण या घटनेची दिलगिरी व्यक्त करतो आणि गैर समजूतेने झालेली घटना पुन्हा होणार नाही अशी मी माझ्या लोकांना समज देऊन व्यक्त करतो असे मांद्रे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक करीत दोन्ही लोकांत तडजोड करीत वादावर पडदा टाकला


