नाशिकात रात्री एका पाठोपाठ एक भूकंप
नाशिक/ वृत्तसंस्था
मध्यरात्री एकापाठोपाठ बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांनी नाशिक जिल्हा पुन्हा एकदा थरारला आहे. काल सकाळी बसलेल्या धक्क्यानंतर मध्यरात्रीच्या शांततेत अचानक जमीन हादरली अन् गाढ झोपेत असलेले नागरिक भीतीपोटी रस्त्यावर धावले. सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.६ रेश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील ननाशी, बागडीचा पाडा आणि पेठ तालुक्यातील शिवशेत परिसरात देखील मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के सलग बसणाऱ्या या हादऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.


