सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध आरेकर तनय रेस्टॉरंट ला उत्कृष्ट मालवणी फुडसाठी झोमेटो चा अवॉर्ड
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या खाद्यसंस्कृतीचे पर्यटन वाढलेले आहे.स्थानिक खाद्य संस्कृतीची चव चाखण्यासाठी जिल्ह्यातील विविध हॉटेल मध्ये पर्यटकांची गर्दी असते.. नेमकं चांगल, स्वच्छ, चविष्ट जेवणाचे हॉटेल शोधताना तारांबळ उडते… अशावेळी गुगल वर सर्च करून पर्यटक आपल्याला आवडीचे हॉटेल शोधतात… आणि आपली आवड जपतात … निरंतर… मग हिच हॉटेल इतरांनाही आवड बनवितात… आणि मग त्यातून प्रसिद्धी आणि गर्दी चा पाहुणचार सुरु होतो… असाच पाहुणचार करणा-या एका हॉटेलला झोमेटो बेस्ट रेस्टॉरंट २०२६ अवॉर्ड मिळाला…
सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध आरेकर तनय रेस्टॉरंट अवॉर्ड २६ हा उत्कृष्ट मालवणी फुडसाठी मिळाला आहे… या रेस्टॉरंट चे मालक निलेश आणि नेहा आरेकर यांचे अभिनंदन होत आहे….त्यांनी सावंतवाडीसह सिंधुदुर्गच्या खाद्य चवीत नवीन भर टाकली आहे.


