कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन शांततेत पार…. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी…
नवी दिल्ली/
अमेरिकेतून भारतात परतलेले संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली ६ जून २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर हजारो तरुणांनी मोठे शांततापूर्ण आंदोलन केले. मात्र एका व्यक्तीने आंदोलकांवर स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला.तेव्हा काही काळ वातावरण अशांत झाले होते. त्यामुळे पोलिसांनी पाण्याचा फवारा मारून शांत केले.
दीपके यांनी सर्व आंदोलकांना सोबत एक पुस्तक, देशाचा तिरंगा आणि पोलिसांना देण्यासाठी ‘फूल’ घेऊन येण्याचे आवाहन केले होते.
मुख्य मागणी: NEET-UG २०२६ पेपर लीक, CUET, CBSE आणि इतर परीक्षांमधील कथित घोटाळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे.
बड्या व्यक्तींचा पाठिंबा: या आंदोलनाला प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ध्रुव राठी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी दिल्ली जिल्ह्याची १२ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संसद मार्ग, जंतरमंतर आणि संवेदनशील भागात २हजाराहून हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


