कोंकणच्या शिक्षणक्षेत्रातील मानबिंदू… सावंतवाडीतील भोसले नॉलेज सिटीचा १२ वा वर्धापनदिन साजरा
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीचा १२ वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गासह गोव्यात भोसले नॉलेज सिटीचा नावलौकिक आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून देशसेवा करीत आहेत. संस्थाध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी रोवलेले हे शिक्षणाची सावली देणारे झाड आज १२ वर्षाचे झाले आहे. त्यानिमित्ताने आज सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली.संस्था सदस्य आस्था यांनी पुजेचे यजमानपद साभाळले. यावेळी संस्थाध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले , सचिव संजू देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ लेफ्टनंट कर्नल रत्नेंश सिन्हा, शिक्षक, कर्मचारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.


