न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा खेमराज दहावी ९१ च्या बॅचतर्फे आरोस दांडेली दिव्यांग शाळेस मदत

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या 1991 च्या दहावी बॅचच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वर्गाने आपल्या गेट टुगेदर कार्यक्रमांनतर शिल्लक राहिलेल्या रक्कमेत भर टाकून 21 हजार रुपयांची देणगी आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ संचलित कर्णबधिर तथा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेस प्रदान केली.

बांदा खेमराज प्रशालेच्या दहावीच्या 1990-91 वर्गातर्फे वेळोवेळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात येतो. अशा स्नेहमेळाव्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जातो. या कार्यक्रमानंतर उरलेल्या 10,500 रुपये रकमेत या वर्गाचे सदस्य शंकर विजय सावंत यांनी आपले वैयक्तिक 10,500 भरीस घातले आणि एकुण 21,000 ची देणगी या सेवाभावी संस्थेला देण्यात आली. तसेच तांदुळ, तेल,पीठ, खाऊ आदी साहित्यही देण्यात आले.

91 बॅचच्या वतीने राजाराम सावंत, वर्षा नाडकर्णी, शंकर सावंत, प्रशांत महाडेश्वर, मुनिरा मुजावर, अजित मयेकर, आशुतोष भांगले यांनी कोंडुरा येथे शाळेत जाऊन ही मदत प्रदान केली. शाळेने तसेच विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी बॅच सदस्य तथा तलाठी वर्षा नाडकर्णी, शंकर सावंत, आशुतोष भांगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांनी तेथील कामकाजाची, वर्गखोल्यांची , शिक्षण पद्धतीची तसेच नव्या इमारतीच्या कामाची पाहणी केली व संस्थेच्या समस्याही जाणून घेतल्या. शाळेचे शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी बांदा खेमराज 10 वी 91 बॅचचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे