सावंतवाडीच्या नगराध्यक्षा टक्केवारीत अग्रभागी: मायकल डिसोझा
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा या टक्केवारीत गुंतल्या असून लवकरच त्यांचा भांडाफोड करणार असल्याचा आरोप जि.प. सदस्य मायकल डिसोझा यांनी केला आहे.
आपल्या आउट सोर्सिंग कंपनीसाठी दोनशे स्क्वेअर फूट जागेसाठी तब्बल ५९ हजार रुपये वसूल केले आहेत.असा आरोप त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून ठेकेदारांना धमक्या येतात.सध्या सावंतवाडी भर पावसात सुरू असलेल्या सर्व कामांत त्यांची टक्केवारी असल्याचा आरोप केला आहे.


