न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गुटखा बंद म्हणजे बंद… तुकाराम मुंढे यांनी अवघ्या १९ दिवसांत धडाकेबाज कारवाई करीत ३५० जणांना अटक केली तर २७४ दुकाने सील मारलीत

मुंबई/ वृत्तसंस्था

अन्न व औषध प्रशासन  आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर धडाकेबाज तुकाराम मुंढे यांनी राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि इतर बंदी असलेल्या अन्नपदार्थांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. २५ मे  ते १२ जून  या अवघ्या १९ दिवसांच्या कालावधीत राज्यभर राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत शेकडो आस्थापनांवर छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, FDA ने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या दहा वर्षांत उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार अशा एकूण ७०३ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही दिवसांत राज्यभर व्यापक स्वरूपात कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे.

१५ मे ते १२ जून या कालावधीत राज्यातील विविध विभागांमध्ये एकूण ३५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४३ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आले. या कारवाईदरम्यान सुमारे ३ कोटी २७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच २३५ आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ३५० जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात

मुंबई विभागात ६८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. सर्वच ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आल्याने २३.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ४३ गुन्हे दाखल करून ७२ जणांना अटक करण्यात आली. तसेच ६३ आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आणि १४.१५ लाख रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली.

कोकण विभागात १३८ जणांना अटक
कोकण विभागात १३८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३६ ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले. येथे २४.०२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ६३ गुन्हे दाखल करून १३८ जणांना अटक करण्यात आली. १२५ दुकाने सील करण्यात आली असून ५.९० लाख रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली.

पुणे विभागात ६५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६३ ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळून ३८.२७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ५४ गुन्हे दाखल करून ६७ जणांना अटक करण्यात आली. ५९ आस्थापने सील करण्यात आली असून ९.३० लाख रुपयांची चार वाहने जप्त करण्यात आली.

नाशिक विभागात २२ आस्थापनांपैकी २१ ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. येथे १ कोटी २९ लाख ७९ हजार ५८८रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, जो राज्यातील सर्वाधिक आहे. 21 गुन्हे दाखल, २१ अटक, १८ दुकाने सील आणि १६.१० लाख रुपयांची चार वाहने जप्त करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर विभागात २७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले. ७१.४६लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १९ गुन्हे दाखल, १७ अटक, ९ आस्थापने सील आणि ७६.५०लाख रुपयांची ९ वाहने जप्त करण्यात आली.

अमरावती विभागात १४ पैकी १४ आस्थापनांमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळले. १६.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १४ गुन्हे दाखल, १४ अटक आणि १२ लाख रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली.

नागपूर व  विभागात २१ पैकी २१आस्थापनांमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळले. २३.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून २१गुन्हे दाखल आणि२१ अटक करण्यात आली. मात्र येथे कोणतेही दुकान सील किंवा वाहन जप्त करण्यात आले नाही”

FDA च्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत २६० उत्पादक, २४८ पुरवठादार आणि १९० वाहतूकदार अशा एकूण ७०३ जणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १९ दिवसांत ३५० अटक, २३५ गुन्हे, २७४ सील कारवाया आणि ३० वाहन जप्ती अशा मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याने राज्यातील गुटखा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध साखळीविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे