राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी आंबोलीत १००० वृक्ष लावणार….. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक १४ जून रोजी आंबोली येथे १००० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या आंबोली येथे १००० विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात येणार असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अनेक सामजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ॲड. अनिल केसरकर यांनी सांगितले आहे.


