न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे प्रदर्शन “कसब २०२६”

सिंधुदुर्ग |राजू तावडे

डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे चालविण्यात येणाऱ्या Foundation Course in Art (One Year) या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे वार्षिक कला प्रदर्शन “कसब २०२६” (तिसरे वर्ष) दिनांक २० व २१ मार्च २०२६ या कालावधीत बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक २० मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. सुनील लाड (सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी, वनविभाग सावंतवाडी) यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच दिनांक २१ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा. सिद्धेश नेरुरकर यांचे “अक्षरलेखन” या विषयावर (मोफत) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी वयोगट इयत्ता दुसरीच्या पुढे असा आहे. याच दिवशी १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम (Fine Art) साठी आवश्यक असणाऱ्या डिग्री कोर्सची माहिती व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या CET संदर्भात मार्गदर्शन संस्थेचे विभाग प्रमुख प्रा. तुकाराम मोरजकर व प्रा. सिद्धेश नेरुरकर यांच्या तर्फे करण्यात येणार आहे.
या संस्थेमध्ये गेली ३ वर्षे हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या चालू असून गेल्या २ वर्षांमध्ये जवळपास ४४ विद्यार्थ्यांनी या कोर्सच्या माध्यमातून CET मध्ये यश मिळवून Degree Course साठी प्रवेश घेतलेला आहे.
तरी सर्व विद्यार्थी, पालक व कला रसिकांनी या कला प्रदर्शनास व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. गोविंद (उर्फ केदार) बांदेकर आणि संस्थेच्या सचिव ॲड. अनुराधा बांदेकर-परब यांनी केले आहे. सदर कार्यक्रम बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट (अप्लाइड आर्ट), सावंतवाडी येथे होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे