न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

इराणला पाठींबा न दिल्याने भारत मोठ्या संकटात सापडणार.. राज ठाकरे

मुंबई | वृत्तसंस्था 

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्याचा विकास, नोकरी, वाहतूक कोंडी यावर सरकारला घेरलं. तसेच त्यांनी इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करताना मोदी सरकारलाही घेरलं. मोदी सरकारने इराणला पाठिंबा न देण्याची मोठी चुक केली आहे. या चुकीचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, असा मोठं भाकितही त्यांनी व्यक्त केलं. आज शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शहरांना आकार राहिलेला नाही. कोणीही येतं कुठेही इमारती बांधतं. कोणालाही कसल्याही इमारती बांधण्याच्या परवानग्या दिल्या जातायत, अशी टाकीहा राज ठाकरे केली.

मनसेच्या स्थापनेला आज गुढीपाडव्याच्या दिवशी 20 वर्षे झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सध्या सगळीकडे धाकधूक आहे. भीषण परिस्थिती आहे. अन्न शिजवायला गॅस मिळत नाहीये. खरं तर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता. त्या इराणवरती जे हल्ले होत आहेत, त्यामध्ये आपण इराणला साथ द्यायला हवी होती. या देशामध्ये येणारं बरचसं तेल इराणहून येतं. ते आपल्याला तेल रुपयात देतात. खामेनेई गेल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी कुठलेही निषेधाचे एकही निवेदन काढले नाही. हल्ल्यावरही कुठले निवेदन दिले नाही,” असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे