हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला ‘ शहवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग| राजू तावडे
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आज सावंतवाडी शहरात भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ काढण्यात आली. सकल हिंदू समाज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ही शोभायात्रेला सायंकाळी राजवाडा येथून सुरू झाली. नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिवरामराजे पुतळा मार्गे भोसले उद्यान अशी ही भव्य मिरवणूक पार पडली. या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आणि सहकुटुंब सहभागी झाले होते.
या यात्रेत बजरंग दल, दुर्गावाहिनी, एकमुखी दत्तमंदिर ट्रस्ट, घे भरारी, गोरक्षक, हरेकृष्ण संस्कार केंद्र, हिंदू वैश्य वाणी संघटना, पाटीदार समाज, पुर्व सैनिक सेवा परिषद, रासाई कला क्रीडा मंडळ, रिक्षा संघटना, सालईवाडा मित्रमंडळ, समता महिला मंडळ, सनातन संस्था, शिवकन्यका, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान, श्री. रामानंद संप्रदाय नरेंद्र महाराज, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सुवर्णकार संघ, वैश्यवाडा मित्रमंडळ, वेदपाठशाळा सावंतवाडी, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, विद्याभारती शिशुवाटिका, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज अशा अनेक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी काढण्यात आलेले विविध देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तर महिलांचे ढोल पथक व लेझीम पथक हे सर्वांचे आकर्षण ठरले.


