आता देवांचेही भय राहिले नाही …. पेशवेकालीन विरेश्वर मंदिरावर चोरट्यांचा डल्ला; शंकराच्या पिंडीवरील २० लाखांचे चांदीचे आच्छादन लंपास
रायगड/ वृत्तसंस्था
चोरांना आता देवांचे ही भर राहीले नाही …. खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात रविवारी पहाटे धाडसी चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे १२ किलो वजनाचे आणि अंदाजे २० लाख रुपये किमतीचे चांदीचे आच्छादन चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


