न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

मुंबई/ वृत्तसंस्था

भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकाडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावले. नाशिक, घाटमाथा पुणे, सातारा याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोदिंया, वाशिम, नागपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला.

अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, बीड, पुणे, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला. सकाळपासून ढगाळ वातावरण असून रात्री अनेक भागात पाऊस झाला. वाशिमच्या मालेगाव आणि मंगरूळपीर कारंजा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रिमझिम  पाऊस बरसला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे