न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत साईश गावडेंची सलग तिसऱ्या वर्षी अव्वल कामगिरी

 

सिंधुदूर्ग/ राजू तावडे 

   आपल्या गुणवत्तेची आणि सर्जनशीलतेची छाप कोल्हापूरच्या भूमीत उमटवत सावंतवाडीच्या साईश गावडे यांने पुन्हा एकदा कोल्हापूर येथील ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत यावर्षी तृतीय क्रमांक मिळविला. सलग तिसऱ्या वर्षी साईशने अव्वल क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण यशामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

साईश गावडे हा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. २०२४ मध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर त्याने ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला आणि थेट प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कलागुणांची दमदार झलक दाखवली.

त्यानंतर २०२५ मध्ये त्याने या स्पर्धेत तृतीय क्रमांक, तर २०२६ मध्ये पुन्हा तृतीय क्रमांक पटकावत आपल्या यशाची मालिका कायम ठेवली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ‘सावंतवाडीच्या मुलाने कोल्हापुरात आपल्या प्रतिभेचा डंका वाजवला’ अशी कौतुकाची भावना व्यक्त होत असून, साईशवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, साईश गावडे सध्या ऑल इंडिया फिजिओथेरपी कॉन्फरन्ससाठी दिल्ली येथे गेला आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील नामवंत फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे