न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पोटच्या मुलीला टाकून जाणाऱ्या आई वडिलांना तीन महिन्यांचा सश्रम कारावास

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर 

पोटच्या मुलीला टाकून जाणाऱ्या आई वडिलांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती एस. जे. पाटील यांनी आज तीन महीने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
याबाबतची हकीकत अशी लवू तुकाराम निकम व मंगल लवू निकम यांनी आपले सहा महिन्याचे बाळ (मुलगी ) हिला औषध उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल केले होते. या बालकावरती औषधोपचार सुरू असताना दिनांक 21 डिसेंबर 2021ला सकाळी पावणे सहाच्या दरम्यान आरोपी यांनी जिल्हा रुग्णालयात कोणास काहीही न सांगता त्या बाळाचा परीत्याग करण्याच्या उद्देशाने बाळाला रुग्णालयात सोडून पळून गेले. यावरून 15 फेब्रुवारी 2022 रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी केला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे स्पेशल सरकारी अभियोक्ता गुरुदास माजगावकर व सरकारी अभियोक्ता श्रीमती शिल्पा गोबाडे यांनी 9 साक्षीदार तपासले.स्पेशल सरकारी अभियोक्ता श्री माजगावकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आज अति मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.जे.पाटील मॅडम यांनी आरोपी लवू तुकाराम निकम वय-30 वर्षे मंगल लवू निकम वय 26 वर्षे दोन्ही राहणार मुणगे,तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांना भादवि कलम 317,34 या अपराधाकरिता 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. केसच्या सुनावणीवेळी पैरवी अंमलदार महिला पोलीस शिपाल शिंदे यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे