न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली करपलेल्या शेतीची पाहणी 

 

सिंधुदुर्ग/  राजू तावडे 

   पाऊस एकाकी गायब झाल्याने मळयात भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या इकडून तिकडून पाणी आणून लावणी उरकत आहे.पण पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर तळेरे (वाघाचीवाडी) ता.कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांना सुचना देऊन शासनाच्या माध्यमातून विशेष मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री राणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

यावेळेस तहसीलदार रिक्षांची देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उप कृषि अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ,मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार, डॉ विजय कुमार शेटये, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे