न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सकल मराठा समाजा तर्फे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार, सीताराम गावडे

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

‌‌दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सकल मराठा समाजा तर्फे दहावी व बारावीच्या परिक्षेत ७० टक्केच्या वर एकूण गुण मिळविलेल्या मराठा समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तर ज्या मुलांना ९० टक्केच्या वर गुण मिळाले असतील अशा मुलांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तरी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नाव, मोबाईल नंबर, मार्क्सिस्ट ८४८४८२७९९३ व ७९७२६४८७८१ या मोबाईल नंबर वर पाठवून आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
गेली पाच वर्षे दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येतो व शिकण्याची जिद्द असणाऱ्या गरजू १० मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. दहावी बारावीच्या परीक्षेत ज्या मराठा समाजाच्या मुलांनी उज्वल यश संपादन केले आहे त्यांनी आपली नाव नोंदणी करावी. सत्काराची तारीख नोंदणी पुर्ण झाल्यानंतर कळविण्यात येईल असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे