न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

इनाम निर्मूलन कायदा आणून जमिनी लाटण्याचा प्रकार… संजय जोशी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

देशात व महाराष्ट्रात हिंदूवादी राज्य असून महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६ अन्वये महाराष्ट्र सरकार देवस्थानच्या जमिनी भूमाफीयांच्या घशात घालणार आहे. छूप्यापद्धतीने देवस्थानच्या जमीन लाटण्याचा हा प्रकार आहे. याला लँड जिहाद हि म्हटले जाऊ शकते. राजकारणी व बिल्डर यांचे साठेलोटे आहे. त्यांचा हा प्रयत्न हिंदू देवस्थानच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे. त्यामुळे इनाम निर्मूलन कायदा आम्ही हाणून पाडू असा इशारा मंदिर महासंघ महाराष्ट्रचे राज्य संघटक श्री. संजय जोशी यांनी आज मंगळवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, हिंदू जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील, श्री. वीरेश माईणकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक श्री. शिवराम देसाई, श्री. यशवंत परब उपस्थित होते.
देशात राहणाऱ्या इतर धर्मासाठी हा कायदा नसून हा कायदा फक्त हिंदूसाठीच करणार आहेत. वक्त बोर्डच्या जमिनीसाठी हा कायदा लागू नाही. केवळ हिंदूंच्या जमिनी या कायद्याने लाटल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून अनेक देवस्थानला दिलेल्या इनाम स्वरूपातील जमिनी बाबतही हे सरकार कानाडोळा करत आहे. असे जोशी म्हणाले.
या कायद्यान्वये हिंदू देवस्थानच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रकार शासन करत आहे. या कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत ही इनामे रद्द करून त्या जमिनी वहीवाटदार आणि पुजाऱ्यांच्या नावे मालकी स्वरूपात वर्ग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे भविष्यात देवस्थाने आर्थिकदृष्ट्या परावलंबी होतील. हा प्रकार संविधानातील अनुच्छेद १४ मध्ये नमूद समानतेच्या अधिकाराच्या विरोधात असून शासनाच्या निधर्मी भूमिकेशी विसंगत आहे. शासनाने हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत अपूरी असून ती किमान दोन महिन्यांनी वाढवावी. शासनाने मसुद्याचा फेर विचार करावा. गुजरातच्या धर्तीवर अँटी लँड गॅबिंग ॲक्ट लागू करून देवस्थान जमिनींना विशेष संरक्षण द्यावे. देवस्थान जमिनी प्रतिबंधक सत्ता प्रकार अशी नोंद त्यांच्या सातबारावर करावी जेणेकरून जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखता येईल. अशी मागणी आपण शासनाकडे केली असल्याचे सांगून शासनाने यावर दखल न घेतल्यास देवस्थानचे इमान जमिनी वाचवण्यासाठी मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा जोशी यांनी यावेळी दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे