पयलो मान कुडाळचो…. कोंकणासह गोव्यात १५ दिवसांच्या रंगोत्सवाला सुरुवात… कुडाळात रंगपंचमी साजरी
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
कोकणासह गोव्यात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. देशात आज जवळपास सर्वच ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते तर काही ठिकाणी रविवारी साजरी करणार मात्र कोंकण आणि गोव्यात १५ दिवसांच्या कालावधीत ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते. आज शहरात पहिला मान कुडाळचा…
कुडाळ शहरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी शांततेत साजरी केली गेली. शबयय… चा नारा नका नाक्यावर ऐकू येत होता.. बच्चे कंपनीसह आबाल वृध्दांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला…


