आयुष हॉस्पिटलची ओपीडी सावंतवाडी सुरू करण्यासाठी आमदार केसरकर आग्रही
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आयुष मंत्रालय आयुर्वेद संस्था गोवा या हॉस्पिटलची सावंतवाडी येथे ओ. पी. डी. सुरू करणेबाबत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज मंगळवारी आयुर्वेद संस्था धारगळ, गोवा येथे आयुर्वेद संस्था गोवा हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकारी व डॉक्टरांची बैठक घेऊन चर्चा केली. सावंतवाडी येथे आयुष हॉस्पिटलची ओपीडी सावंतवाडी लवकरच सुरू करण्या बाबतची कार्यवाही सुरू आहे. ओपीडी सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी दिले.


