न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्ता खचला

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर 

कोंकणात पावसाने जोर धरला आहे अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील मुसळधार पावसाने रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालवाणी फाटा परिसरातील मंडणगड-बाणकोट मार्गावर रस्त्याचा काही भाग खचून मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाची सुरुवात असताना हि परिस्थिती तर पुढे काय होईल हा यक्षप्रश्न नागरिकांत उभा ठाकला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे