शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकरी थेट मुंबईत जाणार
सांगली/ वृत्तसंस्था
सांगली जिल्ह्यातून शक्तिपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून आक्रमक झालेले शेतकरी बांधव शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आता थेट मुंबई गाठणार आहेत. राज्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत असून सांगली जिल्ह्यातील आक्रमक झालेले शेतकरी आता थेट मुंबईला धडक देणार आहेत. 7 जुलै रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.


