न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुणकेरीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

सावंतवाडी (प्रतिनिधी):

कुणकेरी गावातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने जि. प. शाळा कुणकेरी नं. १ येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आज दिनांक 17 जून 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला सावंतवाडीचे तहसीलदार मा. श्री. श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी जि. प. शाळा कुणकेरी नं. १, २ व ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्रीधर पाटील यांनी आपल्या अधिकारी होण्याच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सांगितली. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकते, असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

माजी विद्यार्थी संघामार्फत तहसीलदार श्रीधर पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पुढील काळात कुणकेरी गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे माजी विद्यार्थी संघाने यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. मनोज घाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम माजी विध्यार्थी- केशव सावंत, ब्रिजेश सावंत, नरेश परब – कैलास परब , महेश बाबू सावंत, सचिन मोहन सावंत , आनंद पुजारी प्रशांत सावंत (मधलीवाडी ), मनोज घाटकर यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे संपन्न झाला त्यांचे श्री. मनोज घाटकर यांनी विशेष आभार मानले.

या प्रसंगी कुणकेरीचे उपसरपंच सुनील परब, सामाजिक कार्यकर्ते बावतीस फर्नांडिस (चराठे), मनोज घाटकर, राजन मडवळ, कैलास परब, गुरुदास कुणकेरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश परब, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प. शाळा कुणकेरी नं. ३ च्या उपशिक्षिका श्रीमती निता नितीन सावंत यांनी केले.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे