न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा सत्कार

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा सत्कार करण्यात आला. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी समाजामध्ये जागृत राहून सामाजिक कार्य करणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा गौरव पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे