न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री देव बांदेश्वर कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन सोहळा संपन्न

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याला मंगळवारी
हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शविली. शिव शिव सांब सदाशिव… हर हर हर हर सांब सदाशिव या जयघोषाने मंदिर परिसर चैतन्य व उत्साहाने भरून गेला.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, नेत्रदीपक रोषणाई तसेच तोरणे, कमानी व मंडप उभारण्यात आले होते.
मंगळवारी वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता गणपती पूजन, देवतांना नारळ विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे घालून करण्यात आली. त्यानंतर सकाळी ब्रम्हावृंदाकरवी श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक, श्री देवी भूमिकेच्या मंदिरात श्री सुक्त आवर्तन, तसेच श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवर्तन जप करण्यात आला.
दुपारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती आरती झाली व सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.
त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संध्याकाळी स्थानिक मंडळांच्या भजने,
त्यानंतर गुरूवर्य कै. दिगंबर गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्ग, बांदा यांच्यावतीने गुरुवर्य गुरुदास गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग, नाट्यगीत व भावगीतांचा विशेष गायन कार्यक्रम तसेच
रात्री उत्सवानिमित्त श्रींच्या विशेष सवाद्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थान तसेच सर्व सेवेकरी भाविक भक्तमंडळी आपापली सेवा भक्तीभावाने करून या सोहळ्याच्या यशस्वी कार्यपुर्तीसाठी परिश्रम करताना दिसत होती.
या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून बुधवार दि. १५ रोजी रात्री ९.०० वाजता प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि दूर्वांकुर प्रॉडक्शन दोडामार्ग -सिंधुदुर्ग निर्मित अजरामर ऐतिहासिक नाटक “रायगडाला जेव्हा जाग येते” सादर केले जाणार आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे