न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत कु.युक्ता सावंत हिने प्रथम क्रमांक पटकविला

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

    29वी कॅप्टन.एस.जे.इजीकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशीप वरळी मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली.यामध्ये उपरकर शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली.

यात 50 मिटर .22 पीप साईट प्रोन प्रकारात कु.गौरव दत्तप्रसाद आजगावकर (वेंगुर्ला) याने 600 पैकी 561 गुण मिळवून युथ व जुनिअर गटात दोन कांस्यपदक पटकाविली तसेच त्याने खुल्या गटात चौथ्या क्रमांक मिळवीला. याच क्रीडा प्रकारात खुल्या गटात श्री. विशाल पोळ (कणकवली) याने उत्कृष्ट कामगिरी करून 570 गुण मिळवून कांस्यपदकावर आपले नाव कोरले. त्याचे रौप्य पदक अवघ्या 2 गुणांनी हुकले.याच प्रकारात जुनिअर गटात कु. प्रतीक सुरेश बोवलेकर (वेंगुर्ला) याने 556 गुणांसह चौथा क्रमांक पटकावीला. श्री.कांचन वसंत उपरकर यांनी खुल्या गटात 554 गुणांची नोंद केली तसेच चेतन गौतम चवान (कणकवली) याने 535 गुण मिळविले या सर्वांची निवड पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.याच गटात श्री. सुभाष बोवलेकर (वेंगुर्ला)यांनीही सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली.

50मीटर .22 प्रोन ओपन साईट प्रकारात महिलांच्या गटात युक्ता प्रमोद सावंत हिने पुरुष व महिला या दोन्ही गटातील सर्वोच्च गुणांची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावीत पंजाब येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी.व्ही.मावळणकर नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरली .याच क्रीडा प्रकारात श्री.योगेश लक्ष्मण पारकर याने तृतीय क्रमांक पटकावीला तसेच श्री. स्वप्नील विश्वनाथ शिर्के याने चौथा क्रमांक प्राप्त केला त्याच प्रमाणे श्री.सुमेध सुरेश गावडे,श्री.मयुर भोजु सावंत,

श्री.संदानंद आत्माराम म्हालटकर व श्री.गौरव सोनु कासार यांनी सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी केली.

10 मीटर पीप साईट प्रकारात पहिल्यांदाच सहभागी झालेला कु. शुभ्रव स्वप्नील शिर्के (इन्सुली) याने 400 पैकी 358 गुण मिळविले त्याच प्रमाणे 10 मिटर पिस्तुल प्रकारात कु. कुणाल मुक्तानंद गौडळकर (कणकवली) व श्री प्रशांत सावंत (मुख्याध्यापक,सातार्डा हायस्कूल)यांनीही चांगली कामगिरी करत पुढील स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. त्याच प्रमाणे पीप साईट प्रकारात कु.सौरव विक्रम गावडे (कसाल),25 मिटर पिस्तूल प्रकारात श्री शैलेश विष्णू सावंत (सावंतवाडी)यांनी सहभाग घेवून उत्तम कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले.

वरील सर्व खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडमी, सावंतवाडी व वेंगुर्ला येथे प्रशिक्षक श्री कांचन उपरकर यांच्या मार्गदर्शना खाली सराव करत आहेत तसेच .22 प्रकारातील खेळाडूंना रत्नागिरी चे प्रशिक्षक श्री.पुष्कराज इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व नॅशनल रायफल असोसिएशन चे खजिनदार ॲड. विक्रम भांगले यांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले.निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे श्री.स्वप्नील प्रभू, सहायक महसूल अधिकारी सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे