न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पल्स पोलिओ लसीकरण २९ जून रोजी, पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीचीचे लाभ घेण्याचे आव्हान

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

     राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुकास्तरीय पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची सभा अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रतिनिधी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य, गट प्रवर्तक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच टास्क फोर्स समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली, सांगेली, बांदा, निरवडे, मळेवाड तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागात 28 जून 2026 रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

बैठकीत अध्यक्षांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देताना ज्या ठिकाणी पोलिओ लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात येणार आहेत अशा प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, उपकेंद्रे व इतर ठिकाणांच्या इमारतींच्या चाव्या 27 जून 2026 रोजी ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. तसेच 28 जून रोजी नियोजित वेळेपूर्वी सर्व बूथवर लस उपलब्ध करून देणे, नियुक्त कर्मचारी वेळेत उपस्थित राहणे व स्थानिक मान्यवरांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

यावेळी एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, विशेषतः स्थलांतरित व मजूर कुटुंबातील बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय विभागांनी 28 जून रोजी जनजागृती उपक्रम राबवून मोहिमेस आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

टास्क फोर्स समितीच्या वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, 28 जून 2026 रोजी आपल्या परिसरातील जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण बूथवर जन्म ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना घेऊन जावे व पोलिओ प्रतिबंधक डोस पाजून या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत सहभागी व्हावे असे टास्क फोर्स समिती, सावंतवाडी यांच्या वतीने रवी जाधव यांनी आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे