न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

     श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळ मुंबई या मंडळामार्फत श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असनिये या दोन्ही शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे संस्थापक श्री.एम.डी.सावंत, श्री. भरत सावंत ग्रामपंचायत सदस्य, श्री. लक्ष्मण सावंत, श्री. चंद्रकांत भिसे, प्रार्थमिक शाळेच्या शिक्षिका सौ.गवस यांच्या उपस्थितीत या वह्यांचे वितरण करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळाच प्रशालेस लाभलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले. श्री. एम.डी.सावंत यांनी समाजातून मिळणार्‍या या दातृत्वाचे ऋण कायम लक्षात ठेवून, चांगला अभ्यास करून, प्रशालेच्या उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ दहावीचा निकाल १००% लागला याबद्दल प्रशालेच्या सर्व शिक्षक वर्गाचे कौतूक केले. श्रीदेवी माऊली असनिये ग्रामस्थ मंडळाच्या या योगदाना बद्दल पालक व ग्रामस्थ वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी जेष्ठ शिक्षक राठोड, लिपिक श्री. जी.बी.सावंत, शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रशालेचे शिक्षक श्री. परेश देसाई यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे