न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ताज प्रकल्पाबाबत करारानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा, आमदार दीपक केसरकर 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

 

शिरोडा ताज प्रकल्पाबाबत शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली असून या करारानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. १८५ खातेदारांना ६० कोटींची रक्कम तीन टप्प्यांत वितरीत करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शिरोडा गावाचे नावलौकिक होईल असा विश्वास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच आजगाव येथील मायनिंग प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या भूमीकेसोबत मी असून ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. आज शुक्रवारी सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेल्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेत भ्रष्टाचार होणे चुकीचे आहे. लोकनियुक्त प्रतिनीधींनी असा प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी, असा सल्ला श्री. केसरकर यांनी दिला आहे.

ताज गृपचा हा प्रश्न तांत्रिक बाबींच्या अडचणींमुळे रखडला होता. आता तो सुटला असून स्थानिकांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे‌. नोकर भरतीत देखील स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असून जमीनी गेलेल्या लोकांना देखील तिथे सामावून घेतले जाणार आहे. २ एकर जागा पर्यटनासाठी ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे. यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पालकमंत्री नितेश राणे, शिरोडा ग्रामपंचायत, ताज गृपन मदत केल्याने शिरोडा गावात क्रांती होईल, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाव येईल असा विश्वास आम. केसरकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आजगाव येथील लोकांना जर एखादा प्रकल्प नको असेल तर ते प्रकल्प होऊ नयेत. या प्रकरणात स्थानिक लोकांवर दाखल केलेले गुन्हे बघता तरूणांच भवितव्य धोक्यात येत. मायनिंगला सरकारने परवानी दिली तरीही जनसुनावणी शिवाय पुढील परवानगी दिली जाऊ शकत नाही. लोकभावनेसह मीही राहणार आहे. सर्व्हे झाला म्हणजे मायनिंग होणार असे नाही. मी ग्रामस्थांसह असून त्यांच्यावर झालेल्या केसीस मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली.

यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे