न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना धक्का लागला, खाली पडताच एसटीच्या खाली आली, तरुणीचा जागीच अंत

नाशिक / वृत्तसंस्था

नाशिकमधील गजबजलेल्या ठक्कर बाजार बसस्थानकात एक हृदयद्रावक अपघाताची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा एसटी बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. काल रविवारी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा रामभाऊ शेलार(वय 17) असं या मृत तरुणीचं नाव आहे. आकांक्षा ही आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आली होती. रात्रीच्या वेळी बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. बस पकडण्यासाठी चाललेल्या गर्दीत आकांक्षाला कुणाचातरी जोरात धक्का लागला आणि ती अचानक खाली कोसळली. याचवेळी स्थानकातून पुढे जाणाऱ्या एसटी बसचं मागील चाक तिच्या अंगावरून गेल्यानं तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे